हरोली येथे रविवारपासून पार्श्वनाथ दिगंबर मंदिरात चातुर्मास
हरोली / शिवार न्यूज नेटवर्क :
हरोली (ता. शिरोळ) येथील १०८ पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिरात रविवारी (दि.२) चातुर्मास स्थापना होणार आहे. तसेच सोमवारी (दि.३) गुरूपौर्णिमेनिमित्त दुपारी २ वाजता गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे.
हरोली येथे २९ जूनरोजी श्री १००८ आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांचे परमप्रभावक शिष्य निर्यापक श्रमण श्री १०८ नियमसागर महाराज यांचे ससंघ आगमन झाले होते. गेले २ महिने नियमसागर महाराज आणि संघ यांचा चातुर्मास कुठे होणार याची उत्सुकता संपूर्ण दिगंबर जैन समाजात होती. अखेरीस हरोली येथे चातुर्मास होणार असल्याचे ठरले.
चातुर्मासानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातून धार्मिक प्रबोधन तसेच प्रभावणा होते. म्हणून श्रावकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन हरोली दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा