डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे विद्यार्थी संतोष कदम भारतात टॉप १% मध्ये
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट या विभागामध्ये पीएचडी शिक्षण घेत असलेले संतोष आबासो कदम यांनी एनपीटीईएल या ऑनलाइन सर्टिफिकेशन प्रोग्रॅममधील इंटरनॅशनल मार्केटिंग या कोर्समध्ये ९३% गुण प्राप्त करून भारतामध्ये टॉप १% गुणवंतांमध्ये स्थान मिळविले आहे.
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कदम हे पीएचडी शिक्षण घेत आहेत. क्रेडिट नियमावलीनुसार संशोधक मार्गदर्शकाने पीएचडी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला ऑनलाईन एनपीटीईएल किंवा मुक कोर्सेस सूचित करावयाचे असतात. यामध्ये कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांनी सुचित केलेल्या इंटरनॅशनल मार्केटिंग या एनपीटीईएल कोर्समध्ये संतोष कदम यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराजमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार मा.ऋतुराज पाटील, कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांनी संशोधक विद्यार्थी संतोष कदम, संशोधन मार्गदर्शक कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा