चांद शिरदवाड उपाध्यक्ष शितल लडगे यांचा भाजप कमिटी कडून सत्कार
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चांद शिरदवाड या.निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष पदी भाजपाचे शितल लडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्या बद्दल शिरदवाड भाजप कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथमतः उपस्थितांचे स्वागत संजय पाटील यांनी केल्या नंतर शितल लडगे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य आण्णा पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपाध्यक्ष शितल लडगे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले सदस्य व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायती मध्ये काम करण्याची संधी मिळाली. विद्यमान अध्यक्षांचा कार्य काळ संपल्यानंतर पुढच्या दोन टप्प्यांत आपल्या भाजपा गटाला अध्यक्ष पदांची संधी मिळणार आहे.जोल्ले दाम्पत्याच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जावेद मुजावर, नारायण हिरवे, सुभाष पाटील ,अमर कांबळे, अजित तोडकर, विश्वास नलवडे, संजय पानमळे, अमोल बन्ने, सचिन पुजारी,दिग्विजय इंगळे, सुनील पाटील, रविंद्र स्वामी, दस्तगीर मुजावर, सचिन पडलिहाळे,महावीर लडगे, अमित परकाळे किरण पडलिहाळे,शीतल पाटील, प्रदिप पाटील, महंमद मुजावर, जहांगीर मुल्ला, खुतुबद्दिन चाऊस, इ. मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा