महापुराच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक संपन्न

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

सद्यस्थिती पाहता महापुराचे संकट ओढावेल अशी शक्यता वाटत नाही, तरी देखील नागरिकांनी गाफील राहू नये, धरण क्षेत्रात पडणारा एकूण पाऊस, धरणातील पाणीसाठे, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग या सर्व गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष असून महापूर येऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्याबरोबरच, महापूर आलाच तर आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली, संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका आपत्ती विभागाची बैठक शिरोळ तहसीलदार कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बोलवली होती यावेळी ते बोलत होते,शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापूराशी मुकाबला करण्यासाठी शासन कटीबद्ध असून पूर बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी भयभीत न होता शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि सर्वांनीच सतर्क राहावे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, भाजपा युवा मोर्चा ग्रामिण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव,प्रांताधिकारी सुहास गाडे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते, नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी गावागावात मुक्कामी असलेल्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, जनसंपर्क ठेवावा व पूरस्थिती विषयी जनतेला अवगत करावे, आवश्यक त्या सूचना द्याव्यात मदत व सहकार्य करावे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला माफ केले जाणार नाही असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले, प्रारंभी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी सद्यस्थितीची माहिती बैठकीत सांगितली, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पाटबंधारे विभाग, वीज वितरण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, या विभागाकडील बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पुराने बाधित होणाऱ्या गावात केलेल्या उपाययोजनांबद्दल बैठकीत माहिती दिली, जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न, विद्युत पुरवठ्यांमध्ये होणारे बिघाड, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना देताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी धोकादायक शाळा इमारतींमध्ये शाळेचे वर्ग अथवा अंगणवाड्यांचे वर्ग भरवू नयेत असे आदेश दिले, शेती व शेती पिकांचे नुकसान झाल्यास सत्वर पंचनामे करावेत असे सांगून आमदार यड्रावकर म्हणाले घरात पाणी येण्याची कोणी वाट पाहू नये प्रथम आपले पशुधन व घर मालक बाहेर सुरक्षित ठिकाणी गेले पाहिजेत यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करावे, महापूर आलाच तर पूरबाधीत गावातील तसेच नदीपलीकडील गावातील नागरिकांच्या सोयीसाठी एसटी बसेस यांची सोय उपलब्ध करून ठेवावी, जयसिंगपूर शहरात पुराचे पाणी येते त्या ठिकाणी नालेसफाई तात्काळ करून घ्यावी अशा सूचना ही त्यांनी जयसिंगपूर मुख्याधिकारी यांना दिल्या, कुरुंदवाड शहराला एक बोट देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सांगितले, गावांमध्ये महिला तलाठी अथवा ग्रामसेवक असतील अशा ठिकाणी ज्या गावात महापुराची झळ बसत नाही अशा गावातील तलाठी ग्रामसेवक यांची त्या गावांमध्ये नेमणूक करावी त्यामुळे महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अलमट्टी धरणाचे संबंधित अधिकारी व कर्नाटक शासनाशी महाराष्ट्र शासन समन्वय ठेवून आहे त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या समन्वयांमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळत आहे, तथापि शासन यंत्रणाही सज्ज आहे असे सांगताना १५ ऑगस्टपर्यंत सतर्क राहिले पाहिजे व खबरदारी घेतली पाहिजे असेही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण, वीज मंडळाचे मुख्य अभियंता वैभव गोंदील, पाटबंधारे विभागाचे श्री गळंगे ,कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे, गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, जयसिंगपूरचे पोलीस उपनिरीक्षक, संदीप कोळेकर, शिरोळचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, कुरुंदवाड चे पोलीस उपनिरीक्षक रणजीत फडणीस, यांच्यासह पशुसंवर्धन,सहकार, दूरसंचार तसेच शासनाच्या इतर सर्व विभागाकडील अधिकारी व प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष