कुमार घोसरवाड शाळेत गुरुपौर्णिमा समारंभ संपन्न
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुमार विद्यामंदिर घोसरवाड शाळेत पाद्यपूजनाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत कशाप्रकारे सांगितले आहे त्याविषयी विविध उदाहरणे देऊन साधू,संत, ऋषीमुनी यांच्यामधील गुरु शिष्यांचे महत्त्व समजावून दिले. तसेच आजच्या काळातील भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत कबीर,संत तुकाराम यांच्या प्रति असलेले गुरु शिष्याचे नाते व त्यांचे श्रेष्ठत्व व त्यांचे कार्य हे सुद्धा या देशाला मिळालेली गुरुदक्षिणाच आहे. हे समजावून देऊन आजच्या पिढीला गुरूंचे महत्त्व समजले पाहिजे.त्यांचे आचार,विचार आपण जोपासले पाहिजे.त्यांची शिकवण,त्यांचे महात्म्य समजून घेऊन जीवनात वाटचाल केली पाहिजे.त्यांचे गुण अंगीकारले पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे.आई वडिलांचे महत्व ओळखले पाहिजे व त्यानुसार आपण जीवन जगलो तरच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेला महत्व आहे.हे शामराव कांबळे यांनी सांगितले.यानंतर आई व वडील यांच्या जीवनावरील गीत कमते मॅडम यांनी गायन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. पाद्य पूजनाचे महत्त्व दशरथ खोत व नंदकुमार पवार यांनी सांगितले व सर्व विद्यार्थ्यांचे मार्फत मातांचे पाद्यपूजन करण्यात आले.
याप्रसंगी माता पालक यांच्यावतीने होगाडे वहिनींनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम अतिशय चांगला घेतला त्याबद्दल शिक्षकांना धन्यवाद दिले. व अशा कार्यक्रमांची आज काळाची गरज बनली आहे.असे मत व्यक्त केले.त्यानंतर शिक्षकांचे देखील पाद्यपूजन करण्यात आले.यावेळी जवळपास सव्वाशे माता पालक उपस्थित होत्या.सर्व उपस्थित माता पालकांना व विद्यार्थ्यांना राजू ढोणे यांचे मार्फत मिठाई वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अनिल मंगावे,कमते मॅडम सुशांत कांबळे यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा