शिरोळ तालुक्यातील 'या' १८ शाळांना उद्यापासून सुट्टी

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

कोल्हापूर  जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८ गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सदर शाळांना निवारा कक्ष म्हणून वापरण्यात येणार आहे.

दरम्यान शिरोळ तालुक्यातील १८ शाळांना उद्यापासून सुट्टी जाहिर करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे - अब्दुलललाट, शिरोळ, कुरुंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, हेरवाड, तेरवाड, शिरदवाड, टाकवडे, नृसिंहवाडी, राजापूर, खिद्रापूर, गणेशवाडी, मजरेवाडी, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास या गावातील शाळांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष