संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. विविध विभागातून वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत १०० पैकी १०० गुण मिळवून, विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान याहीवर्षी पटकाविला आहे, या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण ३० विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक टक्केवारी मिळवून यश संपादन केले आहे.

१०० पैकी १०० गुण मिळवून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातुन तृतीय वर्षातील ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन या विषयात कु. प्रतिक अंगडी, कॉम्प्युटर सायन्स विभागातुन द्वितीय वर्षातील मायक्रोप्रोसेसर या विषयात कु. अमुल्या चौगुले व कु. सलोनी भंडारी, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग या विषयात कु.रिया करुणा, सिव्हिल विभागातुन द्वितीय वर्षातुन हायड्रॉलिक्स या विषयात अर्घ्य कोळेकर, प्रथम वर्ष कॉम्प्युटर सायन्स विभागातुन कु. अनन्या मोर्ती, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातुन कु. क्षितीजा मुसळे व मेकॅनिकल विभागातून कु. अमृता देवकर यांनी अप्लाइड मॅथ्स विषयात यश संपादित केले आहेत.

तृतीय वर्षातील विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. गौरी पाटील ९२.९४%, कु. शुभदा रेडेकर ९२.२२%, कु. साक्षी सुडके ९१.९०% गुण प्राप्त केले आहेत.

द्वितीय वर्षामधील विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. अमुल्या चौगुले ९६%, द्वितीय क्रमांक कु.सलोनी भंडारी ९५.७३% व तृतीय क्रमांक निरंजन कुडाळकर आणि सिद्धार्थ कर्णावट ९४.८०% गुण प्राप्त केले आहेत.

प्रथम वर्षातून विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. कविता पुजारी ९५.५० %, द्वितीय क्रमांक कु. अनन्या मोर्ती ९५.१२% आणि तृतीय क्रमांक कु. सिद्धी सावजी ९४.७५ % गुण प्राप्त केले आहेत.

या निकालाबद्दल संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विभागप्रमुखाना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत आणि विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष