खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नाला यश : हातकणंगले रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
केंद्र सरकारच्या `अमृत भारत स्टेशन योजने`तंर्गत हातकणंगले रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच या रेल्वेस्थानकावर विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. या स्थानकांसाठी कोट्यावधी रुपयांची प्रस्तावित कामे केली जाणार आहेत. हातकणंगले रेल्वे स्थानक आदर्श रेल्वे स्थानक बनणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होत असल्याची विशेष बाब निदर्शनास आणली होती. आदर्श रेल्वे स्थानक होण्यासाठी महत्वाचे मुद्दे आणि विशेष कामे करावीत, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार रेल्वेच्या एका समितीने या मागणी तातडीने दखल घेऊन रेल्वेस्थानकात विविध विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतंर्गत प्रतीक्षा कक्ष आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था, प्रशिक्षक (बोगी) इंडिकेटरची तरतूद केली जाणार आहे. हातकणंगले बसस्थानकात बसेसच्या वाहतुकीसाठी पुरेशी जागा नाही, ही मागणी लक्षात घेऊन स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी जिथे दोन रस्ते मिळतात त्या ठिकाणी प्रवेशद्वार करण्याचा निर्णय घेतला जाईल. सुरक्षित पिण्याचे आरओ आणि वॉटर व्हेडिंग मशीनसह कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पुरेशा पाण्याच्या नळांची तरतूद केली जाणार आहे. सध्या वॉटरकूलरची व्यवस्था केली आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आणि सुरक्षेसाठी परिभ्रमण क्षेत्रावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली होती. त्यानुसार अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत ही व्यवस्था केली जाणार आहे. लिफ्ट, रॅम्पची सुविधा केली जाणार आहे. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरीक आणि दिव्यांग प्रवाशांना होणार आहे. प्लॅटफॉर्मवर पेव्हिंग ब्लॉकची कामेही केली जाणार आहेत. ई-स्टेशनसह सीसीटीव्ही बसविण्यात येतील. त्या संदर्भात आरपीएफ, एस अँण्ड टी आणि रेल्वेच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने संयुक्त सर्व्हेक्षण करुन मुख्यालयाला अहवाल सादर केला आहे. 'अमृत भारत स्टेशन' अंतर्गत सर्व प्रवाशांसाठी योग्य रॅम्प प्रदान केला जाणार आहे. हातकणंगले रेल्वे स्थानकावर गैरकृत्याच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जादा कर्मचारी असावेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानकाच्या दोन्ही बाजूला संरक्षित भिंत बांधली जाणार आहे.
हातकणंगलेसाठी १२ कोटींचा निधी
अमृत भारत योजनेतंर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरसाठी १६ कोटी आणि हातकणंगलेसाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर स्थानकाचा पुनर्विकास आराखडा अंतिम करण्याचे काम सुरु असून हे दोन टप्प्यात होणार आहे. दुसया टप्प्यात स्थानकावर प्रवासी उड्डाणपुलासह विविध आवश्यक कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच हे काम सुरु केले जाणार आहे.
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा