कौतुकामधून काम करण्याची प्रेरणा मिळते : गटशिक्षणाधिकारी भारती कोळी

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

कन्या विद्या मंदिर दत्तनगर शिरोळ येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.श्रावणी मनोज मक्ते ही जिल्हा शिष्यवृत्ती धारक झालेने मार्गदर्शक शिक्षिका अस्मिता राजाराम सुतार यांचा सत्कार शिरोळच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी केला.    

         सत्कारप्रसंगी बोलताना गट शिक्षणाधिकारी भारती कोळी म्हणाल्या की, शिष्यवृत्तीच्या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात.त्यांना प्रोत्साहन देवून कौतुक करणे गरजेचे आहे.कारण कौतुकामधूनच काम करण्याची प्रेरणा मिळत असते.

              याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी-अनिल ओमासे साहेब,उर्दू केंद्रप्रमुख रियाज चौगुले,शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घोरपडे, राजाराम सुतार यांच्यासह अध्यापक वृंद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष