अहिंसा, त्याग व लोककल्याणतेला प्राधान्य देणारा जैन धर्म : आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण मुनी महाराज

 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

सकल मानव जातीच्या कल्याणासाठी जैन मुनीनी मोठा त्याग केला आहे.जैन धर्मात अहिंसा व त्याग याला विशेष असे महत्त्व आहे.पाच महिने चालणाऱ्या या चातुर्मास काळात प्राणी पक्ष्यांची हिंसा टाळून लोककल्याणासाठी विविध विधिवत पूजा व शिबिराचे आयोजन करून जैन धर्माचे पवित्रता जपले जाते. समाधीसम्राट शांतीसागर मुनी महाराजांचा आदर्श,त्यांनी घालून दिलेल्या आचार विचार व दिगंबर परंपरेनुसार जैन मुनि आत्मकल्याण व लोककल्याणासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण मुनी महाराज यांनी व्यक्त केले.

आज बोरगाव येथे भगवान पार्श्वनाथ मोक्ष कल्याणक दिवस म्हणजे मुकुटसप्तमीचे औचित्य साधून सर्वोदय पावनवर्षा योगाचे ध्वजारोहण मंडप उद्घाटन तसेच प्रति सम्मेदशिखरजीच्या उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमेचे पूजन आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण मुनी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आले.

प्रारंभी पहाटे धर्मानुरागी आण्णासाहेब हवले दाम्पत्यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण,तसेच नगरसेवक सर्व श्री धर्मानुरागी शरदराव जंगटे यांच्या हस्ते सभा मंडपाचे व सर्वश्री भरत पाटील यांच्या हस्ते प्रति शिखरजीचे पूजन करण्यात आले.त्याग केल्यामुळे श्रावकांचे कर्म मोठे होत असते.जैन धर्मात जन्म झाल्यास प्रत्येकाचा जीवन सार्थक होतो.यासाठी प्रत्येकाने सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे.पंचपरमीष्टी व केवल भगवंतांच्या श्रेष्ठता यामुळे जीवन पवित्र होते.जैन धर्म हा त्याग व अहिंसासाठी प्रसिद्ध आहे.कारण या धर्मात पवित्रता ,श्रेष्ठता,प्रामाणिकता,व दिगंबर जैन मुनिंचे त्याग,तसेच साहित्य,कला,धर्म परंपरा,संस्कृती, सभ्यता,पवित्र तीर्थक्षेत्रे पहावयास मिळतात.या चातुर्मास काळात या ठिकाणी होत असलेल्या विविध पूजा व धार्मिक कार्यक्रमात सहभाग होऊन आपल्या आत्मकल्याणासाठी सर्वजण प्रयत्न करावे असे शेवटी आचार्य श्री कुलरत्न भूषण महाराज यांनी सांगितले.

दि.23/8/2023 भगवान श्री 1008 पार्श्वनाथांचे मोक्ष कल्याण मुकुट सप्तमी दिवशी ध्वजारोहन, भगवज्जीनाभिषेक,सम्मेद शिखरजी पूजा,आचार्यश्रींचे आहारचर्या,भगवान पार्श्वनाथांचे ऐतिहासिक संगीतमय पुजाष्ठक,निर्वाणकल्याण मुकुट सप्तमी पूजा करण्यात आली.

या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी मा. खास.राजू शेट्टी,बसव ज्योती युथ फौंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले,पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अधिक्षक हामसिध्द गोंधळे,विद्यमान नगरसेवक शरदराव जंगटे,हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्ले,अनुज हवले,सौ सुनीता हवले, पवन पाटील,राकेश जैन,राजेश जैन,सुभाष चंदन,यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

____________________________

Ajit kamble Borgaon.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष