जळीत घर नुकसानीबाबत माळी कुटुंबीयांची डॉ. दगडू माने यांनी घेतली भेट

कुरूंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 येथे अचानक लागलेल्या आगीत माळी कुटुंबीयांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना मंगळवारी घडली होती, याबाबतची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दगडू माने यांनी माळी कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शिरोळ चे तहसीलदार अनिलकुमार केळकर यांच्यासह तलाठी व सर्कल यांच्याशी संपर्क साधून माळी कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केली आहे . दरम्यान

प्रहार संघटनेच्या वतीने तसेच शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.

     कुरुंदवाड येथील घारे गल्ली येथील श्रीमती महानंदा माळी याचे कुटूंब वास्तव्यास आहे. श्रीमती महानंदा माळी यांना बोलता येत नाही . त्या मूकबधीर आहेत त्यांना दोन मुले आहेत त्या दोघांची लग्ने झाली असून त्यामधील एक मुलगा आणि सून देखील मुकबधीर आहेत दोन्ही मुले पेंटींग काम करतात तर सुना देखील कामावर जातात त्यामुळे श्रीमती महानंदा घरी एकट्याच होत्या त्याच्या राहत्या घरावरील माळाला अचानक आग लागली आणि बघता बघता घर जळून खाक झाले.

    अचानक भीषण आग लागली सुदैवाने घरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली मात्र,ही आग एवढी भीषण होती, की या आगीमध्ये घरावरील संपूर्ण छत जळाले तसेच घरातील इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले. 

       या घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माळी कुटुंबीयांना धीर दिला. तातडीने त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्याची विनंती केली. दरम्यान शासकीय पातळीवर व समाजातील दानशूर व्यक्तींनी माळी कुटुंबीयांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सुधाकर तावदारे, संजय पाटील, रियाज बेपारी, सुरेश कांबळे, दिनकर ढाले, जावेद बागवान, शाहीर आवळे, यश चव्हाण, गजानन भोसले, राजू घारे, हर्षद बागवान, आप्पा बंडगर, चांद कुरणे , आप्पा बंडगर यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष