सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अ‍ॅड. अनिरूध्द कांबळे - केंद्रीय प्रमुख रमेश कोळी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड मधील युवा वकील अनिरुध्द कांबळे हे सर्वसामान्य,गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटत असतात असे प्रतिपादन दत्तवाड केंद्राचे केंद्रीय प्रमुख रमेश शंकर कोळी यांनी केले.

       कुरुंदवाड बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.  सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेल्या न्यायांसाठी अ‍ॅड. अनिरुध्द कांबळे सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यांच्या कार्यासाठी उपाध्यक्षपदाचा निश्चितच उपयोग होईल असे मत दिलीप शिरढोणे यांनी व्यक्त केले. न्यायालयीन क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातील योगदानही वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन शिवारवार्ता न्यूज नेटवर्कचे संपादक संतोष तारळे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना अ‍ॅड. अनिरुद्ध कांबळे म्हणाले की सर्वसामान्यांच्या व सामाजिक प्रश्नांसाठी यापुढेही योगदान देवू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष