राजापूरच्या तंटामुक्त अध्यक्षपदी शंकर उर्फ दानू पाटील यांची निवड
राजापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील राजापूर गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी माजी सरपंच शंकर उर्फ दानू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पाटील हे राजापूर गावचे सरपंच पाच वर्ष, पाच वर्ष उपसरपंच, शिरोळ तालुका काॅग्रेस सचिव तसेच २६ वर्ष गटसचिव काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबरोबर सामाजिक क्षेत्रात आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे.
त्यांची नुकतीच राजापूर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा