पगार वाढीसाठी स्टार कामगारांचे माणकापूर ग्रामपंचायतीला निवेदन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
माणकापूर ता.निपाणी येथे असलेल्या स्टार पान मसाला व्यवस्थापनाकडे कामगारांनी पगार वाढीची मागणी केली असुन ग्रामपंचायतीने यावर तोडगा काढुन कामगारांना वाढीव पगार मिळावा यासाठी कामगारानी ग्रामपंचायत व कारखाना व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.याबाबत स्टार कारखाना व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता कामगारांच्या हितासाठी नेहमीच निर्णय घेतला असून आपण कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले .
याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात कामगार व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत माणकापूर येथील कामगारांना न्याय मिळावा यासाठी श्रमिक कामगार कल्याण सेवा संघ, घोडावत पान मसाला व एलएलपी कामगार युनिट यांच्यावतीने माणकापूर ग्राम पंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,घोडावत पान मसाला येथे काम करणाऱ्या कामगारांना वार्षिक ४० टक्के पगार वाढ मिळावी. वर्षातून चार वेळा मेडिकल चेकअप व्हावे. सर्व कामगारांना २० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. पण अजूनही कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे माणकापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने माननीय जिल्हाधिकारी, कामगार कल्याण मंत्री, कामगार आयुक्त यांची भेट घडवून कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी सांगितले .
यावेळी कामगारांच्या पगार वाढी संदर्भात स्टार पान मसाला प्रशासनाचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आपण कामगारांची कोणतीही पिळवणूक केली नाही. हा विषय संबंधित कंत्राटदार यांचा आहे. करारात ठरल्याप्रमाणे आमची सेवा सुरू आहे.तरी देखील कामगारांच्या हितासाठी कामगारांना, विमा व वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कामगारांच्या कुटुंबाचा विचार करून प्रति महिना एक हजार रुपये पगार वाढ केली असल्याचे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे , सदस्य अभय चौगुले , ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले, युनूस मुल्लाणी, धनंजय माळी, पीडिओ नंदकुमार फप्पे,सचिन छत्रे, किरण लेबरचे धनंजय माळी, यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, महिला ,व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा