शिरढोण मध्ये दारूबंदी असताना परमिट सुरु करण्यासाठी ज 'बार' ची मदत ?
शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये सन 2015 मध्ये झालेल्या महिलांच्या गावसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला असल्याचे समजते, असे असताना सदरच्या ठरावाचे प्रोसिडिंग शोधण्यासाठी शिरढोण ग्रामपंचायतीला तब्बल ९ तास लागले, तरीही सदरचे प्रोसिडिंग सापडलेच नाही ? त्यामुळे हे प्रोसिडिंग गहाळ झाले की गहाळ केले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या बार च्या परवान्यासाठी ज 'बार' चा हात असल्याचे अनेक सदस्य व ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीत बोलून दाखवले.
सन २०१२ साली झालेल्या गावसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता, याला शह देण्यासाठी सन २०१५ मध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या गांवसभेत पुन्हा सहा जणांच्या परमिट रूम बिअर बारला मंजूरी देण्यात आली आणि वादाला तोंड फुटले, गावातील महिला आक्रमक होवून उभी बाटली आडवी करण्यासाठी सन २०१५ मध्येच विशेष महिला गावसभा घेवून पुन्हा दारु बंदीचा ठराव करुन बाटली आडवी केल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले.
मात्र असे असताना गावांमध्ये परमिट रूम बिअर बारचा घाट घातलेल्या लोकांनी ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना अंधारात ठेवून हॉटेलच्या नावाखाली परमिट रुम सुरु करण्याचा घाट घातला आणि काही एका दिवसातच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी सही करून तातडीने कागदपत्रांची पूर्तता केल्याचे समोर आले इतकेच नव्हे तर सन २०१५ मध्ये झालेल्या महिला गावसभेचे प्रोसेडिंग शोधायला ग्रामपंचातीला ९ तास लागले तरीही ते सापडले नाही, त्यामुळे हा नियोजनबद्ध कार्यक्रम सर्वांच्या समोर आल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून बार चा परवाना देण्यासाठी कागदपत्रे गहाळ करण्यामध्ये संबंधित अधिकारी आणि ज 'बार' चा हात असल्याचे ग्रामपंचायतीत बोलून दाखवले असून उपसपंच चौधरी यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधिता वर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा