युवासेनेमार्फत राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना मार्फत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.रविवार दि.२७ आॕगष्ट रोजी प्राथमिक फेरी जुनिअर कॉलेज अॉफ दि न्यू एज्यूकेशन सोसायटी डी.एड्.कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी तर अंतिम फेरी रविवार दि.३ सप्टेंबर रोजी शिवसेना भवन मुंबई येथे होणार आहेत.यासाठी अनुक्रमे २५०००/- , १५०००/-, १००००/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे.कोल्हापूर जिल्हा,हातकणंगले लोकसभा युवासेना विस्तारक डॉ.सतीश नरसिंग , जिल्हा युवाअधिकारी शिवाजी पाटील यांनी यासंबंधी पदाधिकारींना मार्गदर्शन केले तसेच शिरोळ तालुक्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन उप जिल्हा युवाअधिकारी प्रतिक धनवडे,तालुका युवाअधिकारी निलेश तवंदकर यांनी केले. यावेळी उप जिल्हा समन्वयक पिंटू पाटील,वैभव गुजरे,मंगेश पाटील,श्रेणिक माने,प्रतिक पाटील,निखिल शिंदे,असिफ विजापूरे,संकेत खराडे,दिग्वीजय चव्हाण,प्रविण खाडे,अनिल पवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष