अकिवाट प्रभाग तीन मधून नव्या शितल प्रवाहास सुरुवात
अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट ता. शिरोळ येथे नव्या पर्वाला सुरुवात करून प्रभाग तीन मधील उच्चशिक्षित सदस्य शितल हळींगळे सर यांच्या कल्पनेतून अकिवाट ते मजरेवाडी मुख्य रस्त्यावर सुमारे २कि.मी.अंतर असून त्याच्या दोन्ही बाजूने २०० झाडे लावण्याचा संकल्प केला होता.
आज १५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त झाडे लावण्यात आली.तसेच झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे.यासाठी वर्षभरासाठी स्वखर्चातून त्याला लागणारे खत व प्रत्येक रविवारी टँकरने पाणी सोडून किमान ९० टक्के झाडे जगवणार. असा मनोदय ठेवून कामाला सुरुवात केली.
त्यावेळी गावातील तरुण मंडळी, सेवाभावी संस्था यांनी आपल्या मनाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. तसेच गेले आठवडाभर ही मोहीम चालू आहे. त्यामध्ये सदस्य आपल्या दारी स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण चे काम आधी घेतल्याबद्दल सदस्यांचे कौतुक केले. तसेच गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडी यांनी झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल व गावांमधील अनेक युवा वर्ग,ज्येष्ठ महिला वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेचे नेते बाळसिंग रजपूत,माजी सरपंच विशाल चौगुले यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले.
त्यावेळी ग्राम सुधारणा आघाडीचे सदस्य व सदस्या गावामधील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग,महिला मंडळी व ज्येष्ठ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याची चर्चा गावातच नसून पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा