मंगळवारी जागृत देवस्थान श्री रेणुका मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याचे आयोजन

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील जागृत देवस्थान श्री रेणुका मंदिराचा शिखर, कलशारोहण व वास्तुशांती सोहळा मंगळवार दिनांक 5 रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री रेणुका भक्त मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. 

मंगळवारी सकाळी श्री रेणूका देवीची मूर्ती व तसेच कळस मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ : ३० वाजता कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. यानंतर राजेंद्र पोतदार यांच्या हस्ते कळस पूजा होणार आहे. तर रत्नकांत शिंदे काकाश्री महाराज यांच्या अमृत हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

शुक्रवार दिनांक ८ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शिखर, कलशारोहण व वास्तुशांती सोहळा कार्यक्रमाचा लाभ गावातील ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन श्री रेणुका भक्त मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष