शिरोळ तालुक्यात ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिरोळ शहर व परिसरात मंगळवारी ध्वजारोहण सोहळा अमाप उत्साहात संपन्न झाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत गेली तीन दिवस विविध कार्यक्रम राबविण्यात आले हर घर तिरंगा या अभियानामुळे सर्वत्रच देशभक्तीपर वातावरण झाले होते

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी शहरात सकाळपासूनच देशभक्तीपर गीतांची धून प्रसारित झाल्याने वातावरणात राष्ट्र अभिमानाचा माहुल निर्माण झाला होता.

शिरोळ नगरपालिकेमध्ये आणि शिवाजी चौकातील सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्यासह सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी शपथ ग्रहण करण्यात आली संगमनगर येथील ध्वजारोहण नगरसेवक डॉ अरविंद माने यांच्या हस्ते करण्यात आले शिवाजी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेत संस्थेचे सभासद सुभाष ताराप-माने यांनी ध्वजारोहण केले शिरोळ पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्र येथील ध्वजारोहण उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेत लायन्स क्लबचे सदस्य व युवा उद्योजक अभिजीत माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेच्या वतीने पालक आणि विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आले.

शिरोळ पंचायत समितीमधील ध्वजारोहण गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते झाले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वज मानवंदना दिली.

शिरोळ तहसील कार्यालयात तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयात तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला माजी आमदार उल्हास पाटील निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्यासह प्रमुख अधिकारी कर्मचारी शाळेतील विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्राथमिक माध्यमिक शाळा बँक पतसंस्था दुध संस्था सहकारी विकास सेवा संस्था शासकीय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक तरुण मंडळ आणि प्रत्येक घराघरात सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले.

देशाचा अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मेरा माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत मिट्टी को नमन वीरों को वंदन पंचप्रण शपथ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाच्या शील फलकाचे अनावरण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय व माजी सैनिक आणि वीर पत्नी वीर माता यांचा सन्मान वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत ७५ देशी वृक्ष लागवड हर घर तिरंगा असे उपक्रम गेले तीन दिवस राबविण्यात आले यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्र अभिमान जागृत झाला होता मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिलेबी,  बालूशा असे गोड पदार्थांचे स्टॉल विक्रीसाठी लावण्यात आले होते या स्टॉलवर जिलेबी खाजा बालूशा असे गोड पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गोड पदार्थ खरेदी करून तोंड गोड करून स्वातंत्र्य दिन साजरा केला दिवसभर चौका चौकात देशभक्तीपर गीतांची धून प्रत्येकाच्या कानी ऐकू येत होती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेले मेरी माटी मेरा देश हे अभियान आणि ध्वजारोहण सोहळा अमाप उत्साहात संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष