शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकास कामांसाठी दहा कोटीचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी (२५१५-१२३८) या योजने अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,
२०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी हा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे,
अंतर्गत रस्ते, सभागृह बांधकाम, स्मशानभूमी सुधारणा, गटर्स करणे, व्यायामशाळा बांधणे, पथदिवे बसवणे, पेविंग ब्लॉक्स बसवणे, संरक्षक भिंत बांधणे, चौक सुशोभीकरण करणे गावांमधील या विविध विकास कामांसाठी मंजूर निधीचा विनियोग करण्याचा आहे, ज्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे त्याच कामांसाठी निधी खर्च करणे बंधनकारक असते,मोठ्या प्रमाणात मंजूर झालेल्या या निधीमुळे शिरोळ तालुक्यातील गावांना भरीव निधी प्राप्त होणार असल्याने या निधीमुळे ग्रामीण भागातील अनेक विकास कामांना चालना मिळणार आहे, सध्या गावागावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे पाईपलाईनच्या कामामुळे अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी देखील या निधीचा विनियोग करता येणार आहे, असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे, हा निधी मंजूर केल्या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत, या मंजूर निधी मधून अब्दुललाट, उमळवाड, यड्राव, दानोळी, अकिवाट, औरवाड, संभाजीपूर, शिरटी, कवठेसार, नांदणी, दत्तवाड, आलास, गणेशवाडी, शेडशाळ, शिरढोण, सैनिक टाकळी, कोथळी, मौजे आगर, निमशिरगाव, घोसरवाड, कवठेगुलंद, नवे दानवाड, अर्जुनवाड, हेरवाड, हरोली, शिरदवाड, चिंचवाड, चिपरी, जैनापुर, बुबनाळ, गौरवाड, तेरवाड, कनवाड, लाटवाडी, घालवाड, नृसिंहवाडी, कुटवाड, जांभळी, कोंडीग्रे व टाकवडे, उदगाव, मजरेवाडी, हसुर, टाकळीवाडी, जुने दानवाड, तमदलगे, राजापूरवाडी, शिवनाकवाडी या तालुक्यातील गावांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा