सामाजिक न्याय विकास योजने अंतर्गत शिरोळ तालुक्याला ५ कोटीचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा अथवा गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी सुचवलेल्या कामांना शासनस्तरावरून मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास सेवा योजना शासनाने सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकात म्हंटले आहे.
मंजूर झालेल्या या निधीमधून सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे, स्मारके उभारणे, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र, वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, गटर्स करणे, सांस्कृतिक हॉल बांधणे, स्मशानभूमी सुशोभीकरण, संरक्षक भिंत, निवारा शेड उभारणे, पेविंग्ज ब्लॉक्स बसविणे, शॉपिंग सेंटर बांधणे इत्यादी कामे करता येणार आहेत असे सांगताना शिरोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत,५ कोटीच्या मंजूर निधी मधून नांदणी २५ लाख ,अब्दुललाट २५ लाख, उदगाव २५ लाख, दत्तवाड ५० लाख, अर्जुनवाड २५ लाख , अकिवाट २५ लाख, दानोळी २५ लाख, कनवाड २५ लाख, यड्राव २५ लाख, शिरढोण २५ लाख, निमशिरगाव २५ लाख, शिरदवाड २५ लाख, कोंडीग्रे २५ लाख, हरोली २५ लाख, नवे दानवाड २५ लाख, कोथळी २५ लाख, शिरटी २५ लाख , औरवाड २५ लाख , शेडशाळ २५ लाख रुपये याप्रमाणे शिरोळ तालुक्यातील १९ गावांना हा निधी मिळणार आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा