मानकापूर प्राथमिक कृषी संघाकडून 13% लाभांश जाहीर : अध्यक्ष दादासो पुजारी यांची माहिती
संघाची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी तालुक्यातील मानकापूर कसनाळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या माणकापूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाने गरजवंतांना मदतीचा हात देत आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे चालवीत असून सर्व संचालक मंडळाच्या निर्णयानुसार यंदा सभासदांना 13 टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ दादासो पुजारी यांनी दिली.
संघाच्या सभागृहात आयोजित 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले, गावातील शेतकरी बांधवांना शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज देण्याबरोबरच तीन टक्के व्याजाने ट्रॅक्टर ,वापरांसाठीही कर्ज योजना ची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या अल्पदरात कीटनाशके वितरण करीत असून संघाच्या वतीने लवकरच खत विभाग ही प्रारंभ करणार आहे .अहवाल वर्ष अखेर संघात एकूण 911 सभासद ,51 लाख 37 हजार 550 रुपयांचे भाग भांडवल ,1 कोटी 07 लाख 96 हजारांचा निधी असून 2कोटी 76 लाख 78 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच बिडीसीसी बँक सह इतर ठिकाणी एकूण 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बीडीसीसी बँक कडून 3 कोटी 84 लाख 17 हजार रुपयांचे कर्ज दिले असून, 6 कोटी 18लाख 33 हजार रुपयांचे इतर कर्ज वाटप करण्यात आले आहे .अहवाल सालात संघास 22 लाख 13 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी हातभार लावावा अशी मागणी केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद कृष्णात कोळी हे उपस्थित होते. संघाचे सीईओ प्रदीपकुमार रूगे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून सभेपुढील विषयाचे मांडणी केली व शासनाच्या विविध धोरणांची माहिती देऊन संघाच्या वतीने अनेक योजना हाती घेण्यात आली असून सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी संघाच्या वतीने संघ स्थापनेसाठी सहकार केलेल्या विविध मान्यवरांचा, सैन्य दलात भरती झालेले युवकांचा व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुकुंद कुलकर्णी जयपाल चौगुले अनिल म्हाकाळे, धनंजय माळी ,दगडू कुंभार, संघाचे उपाध्यक्ष अमोल माळी, संचालक मल्लाप्पा हांडे ,नामदेव बन्ने, काशिनाथ कुटवडे, बाळासो माळी ,दिगंबर माने, नीता पाटील, धोंडूबाई हंडे ,प्रभाकर चव्हाण ,रावसाहेब बत्ते, संदीप बन्ने ,विठ्ठल कट्टेकर, विजय माळी यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा