तुषार कांबळे यांच्या सामाजिक कार्याचा युवकांनी प्रेरणा घ्यावी : भीमपुत्र संतोष दोड्डमनी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

     आजच्या युगात राजकारणा पेक्षा सामाजिक कार्याला मोठे महत्त्व आहे, त्यामुळे आजचे अनेक युवक सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचे कार्य सामाजिक कार्य प्रेरणा देत आहे, समाजासाठी आपण काहीतरी देण लागतो या उदात्त हेतूने आज तुषार कांबळे यांनी वाढदिवशी होणारा डॉल्बी केकला व अन्य कार्यक्रमाला फाटा देऊन समाजातील गरजू लोकांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावे या उद्देशाने आज त्यांनी वाढदिनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत . हे आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे मत चिकोडीचे सामाजिक कार्यकर्ते भीमपुत्र संतोष जोडमणी यांनी व्यक्त केले.

 ते बोरगाव येथील बेडकिहाळ रोड वरील राज किचन हॉलमध्ये तुषार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगाव जिल्हा मानव बंधू वेदीकेचे जिल्हाध्यक्ष व बेळगाव जिल्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट संचालक जीवन मांजरेकर हे होते.

   सुरुवातीस वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तुषार कांबळे वाढदिवस उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्याकडून व्यासपीठावरील बोरगावचे युवा नेते पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष नवले, नगरसेवक दिगंबर कांबळे, रोहित पाटील, अमर शिंगे, जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, भीम पुत्र संतोष दोडमणी, जीवन मांजरेकर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचा तुषार कांबळे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

    पुढे बोलताना भीम पुत्र संतोष दोड्डमनि म्हणाले की आंबेडकरवादी विचारचे युवक आज प्रत्येक समाजात निर्माण होणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक कार्याला मोठे महत्त्व दिले आहे त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज तुषार कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध गरजूना जीवनावश्याक वस्तूंचे किट वाटप व आशा कार्यकर्त्यांना ब्लँकेट् वाटप करून एक सामाजिक उपक्रम राबविला आहे. या सामाजिक कार्याला नेहमीच आमचा पाठिंबा राहील. असा विश्वास चिकोडीचे भीम पुत्र संतोष दोड्डमनी यांनी व्यक्त केला.

  तुषार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील सरकारी दवाखान्याच्या आवारात वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप व बोरगाव आणि परिसरातील आशा कार्यकर्त्यांना ब्लॅंकेटचे भेटवस्तू व त्यांचा सन्मान तसेच निराधार गरजूना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच जानकी वृद्धाश्रम अनाथ आश्रम मध्ये धान्यवाटप त्याशिवाय बोरगाव बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान मोहीम, असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेआहेत. कार्यक्रमाचे वेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तसेच पृथ्वीराज पाटील दिगंबर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

  निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील, बोरगाव भाजपचे नेते सुनील पाटील, चिकोडीचे हेस्काम चे पीएसआय भरतगौडा ,तसेच सदलग्याचे पीएसआय बिरादार साहेब, निवृत्त एस पी अरविंद घट्टी साहेब यांनी दूरध्वनीवरून तुषार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाच्या प्रसंगी चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले तसेच भरत जंगठे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या कडून तुषार कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले, माजी तालुका पंचायत सदस्य विजयकुमार शिंगे, चिकोडीचे जीवन मांजरेकर, चिकोडीचे प्रभारी तहसीलदार केशव कटम, नगरसेवक संतोष नवले, युवा उद्योजक सोनल यादव, नगरसेवक दिगंबर कांबळे, रोहित पाटील, अमर शिंगे, क्रीडा शिक्षक महादेव कोरव, भरत कांबळे ,पटण पंचायतचे क्लार्क पोपट कुरळे, भरत जंगठे ,विशाल म्हेत्रे, किरण काळे ,कुशल सिंग रजपूत, कुमुदिनी महाजन, प्रवीण कोटबागी, अण्णासाहेब कदम, बाबुराव कांबळे, सुहास कांबळे, विजय कांबळे, पत्रकार नितीन कुरळे, विशाल शिंगे, संध्या मिस्त्री, हर्षवर्धन खांडेकर यांच्यासह बोरगाव सह परिसरातील पत्रकार आशा कार्यकर्ते, पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केले तर आभार अशोक दुर्गमूर्ती मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष