सभासदांच्या विश्वासावर दत्त नागरीची यशवी घौडदौड सुरू : चेअरमन माधवराव घाटगे
४८ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
![]()  | 
| दत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी मार्गदर्शन करताना चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे. शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व संचालक मंडळ. | 
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सभासदांची विश्वाहर्ता हीच दत्त नागरी पत संस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून संस्थेला उर्जितावस्था आणणेसाठी प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या काळात संस्थेला गतवैभव प्राप्त होईल व परत सोन्याचे दिवस येथिल असा विश्वास गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. श्री दत्त नागरी सह पत संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री . घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले.
यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उच्चावत चालला आहे. सन २०२२- २३ या आर्थिक वर्षात ठेवी मध्ये ८ कोटी रुपयांची वाढ झाली असून एकूण ठेवी ८६ कोटीवर गेल्या आहेत. तसेच अहवाल सालात संस्थेने ११९ सभासदांना ४ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. येणारा काळ हा दत्त नागरीचा सुवर्णकाळ असणार आहे. सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा विश्वास यावेळी श्री. घाटगे यांनी व्यक्त केला. संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने -देशमुख व संचालक शिवाजीराव जाधव- सांगले यांची गुरुदत्त शुगर्स च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल, कोल्हापूर स्पोर्ट्स् क्लबच्या ऑलम्पिक डुथ्लॉन फिनिशर ऑलओव्हर रॅक मिळवलेबदल एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, भाजपा शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुकुंद गावडे यांचा सत्कार श्री. घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सभेला संस्थेचे व्हा.चेअरमन धोंडीराम खोत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, माजी व्हा. चेअरमन अशोक जगताप, गुरुदत्त शुगर्स चे संचालक धोंडीराम नागणे, चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे, भगवानराव घाटगे सेवा सोसायटीचे चेअरमन विजय गोधडे, व्हा.चेअरमन केशव घाटगे, ज्योती गोधडे, पंतगराव गोधडे, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा