गणेशवाडी पोलिसांच्या हिटलिस्टवर ; १८ जणांना हद्दपारची नोटीस
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील गणेशोत्सवात गेल्या दोन वर्षांपासून गालबोट लागले आहे. त्यामुळे मिरवणुकीत हुल्लडबाजी करुन पोलिसांच्याच अंगावर जाण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवणार्या १८ जणांना कुरुंदवाड पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे गणेशवाडीचा गणेशोत्सव पोलिसांच्या हिटलिस्टवर आला आहे.
गणेशवाडी हे कर्नाटक सीमेवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव आहे. आर्थिकदृष्ट्या सधन गाव मानले जाते. मात्र कर्नाटक सीमा भागातून दारु, गुटखा, गौन खनिजांच्या तस्करीमुळे हे गाव नेहमी चर्चेत असते.
गावातील सार्वजनिक गणेशोत्सव पाचव्या दिवशीच विसर्जन करण्याची पुर्वीपासुन परंपरा नव्या पीढीने आजही कायम ठेवली आहे. गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर प्रत्येक मंडळ लाखो रुपये खर्च करून कमाणी उभारली जाते. या आकर्षक कमानी करण्यावर मंडळामंळामध्ये स्पर्धा असते. हेच येथील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकांची उपस्थिती असते. त्यामुळे येथील गणेशोत्सव पश्चिम महाराष्ट्रात परिचित आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जपत शांततेत पार पडणार्या या गणेशोत्सवात गेल्या दोन वर्षांपासून हुल्लडबाजी तरुणांमुळे गालबोट लागले आहे. दोन वर्षांपूर्वी मिरवणूक पुढे नेण्यवरुन वाद होवून काही तरुणांनी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार या़च्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला होता. तर गतवर्षी फटाकेची माळ पेटवून आकाशात फिरवण्याचा अगावूपणा केल्याने पोलिस हवालदार विजय घाडगे यांच्या डोळ्याला लागून ते जखमी झाले होते.
शांततेत पार पडणाऱ्या गणेशोत्सवात हुल्लबाजामुळे गालबोट लागत असल्याने पोलिसांनी गावातील १८ जणांना तालुक्यातून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हुल्लबाजांवर अंकूश ठेवण्यात पोलिसांना काहीअंशी यश आले असले तरी ऊत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी गावाला हिटलिस्टवर ठेवले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा