बबन यादव यांना पितृशोक
जयसिंगपूर :
चिपरी गावचे माजी सरपंच बबन यादव यांचे वडील हरिभक्त श्री आनंदराव गणपती यादव यांचे रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वयाच्या 92 व्या वर्षी जयसिंगपूर येथे वार्धक्याने दुखद निधन झाले, चिपरी चे माजी सरपंच बबन यादव यांचे ते वडील होत, त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली, भाऊ, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे, उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ताडे, माजी नगरसेवक सर्जेराव पवार,शितल गतारे,महेश कलकुटगी, अर्जुन देशमुख, खाडे बंधू, एडवोकेट संभाजीराजे नाईक, एडवोकेट एस.डी. जगदाळे,संभाजी कोळी,प्रकाश पवार,अमोल शिंदे, पत्रकार अमर पाटील, पप्पू दानोळे, बंडू निटवे, विजित पाचोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे स्वीय सहाय्यक अजय पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे संचालक अरविंद मजलेकर चिपरीचे माजी सरपंच रमेश रजपूत, शिवाजीराव बेडगे, अभिजीत भोसले, गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, आनंदा पांडव,अभय पाटील,यांच्यासह चिपरीतील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक तसेच चिपरी व जयसिंगपूर शहरातील मान्यवर उपस्थित होते रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता वैकुंठ स्मशानभूमी उदगाव जयसिंगपूर येथे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा