बोरगाव येथील श्री अरिहंत मल्टीस्टेट संस्थेची निवडणूक बिनविरोध
सहकार रत्न, रावसाहेब पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून खडकलाटचे सतीश पाटील यांची निवड
अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क:
कर्नाटक राज्यसह आता महाराष्ट्र राज्यातही पदार्पण करीत सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या बोरगाव येथील श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट)या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील व उपाध्यक्ष म्हणून सतीश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी,बेळगाव प्रांतचे सहकार संयुक्त निबंधक डॉ. सुरेशगौडा यांनी केले.
पंचवार्षिक निवडणुकीत निवड झालेल्या संचालकांपैकी अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष म्हणून सतीश पाटील ,व संचालक म्हणून अभिनंदन पाटील, सुभाष शेट्टी,अभय करोले,जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील,भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे,बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे,सौ. अनिता मगदुम ,निर्मला बल्लोळे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने,अजित कांबळे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सभासदांचा मी ऋणी आहे. गेल्या 32 वर्षापासून अरिहंत संस्थेने सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केले आहे. संस्थेच्या वतीने कर्नाटकात लखनापूर , भिवशी, शिरगुपी ,महेशवाडगी, दरूर, एकसंबा ,चंदुर, येडूर , सत्ती , बुदिहाळ , कटकोळ ,चंदर्गी, यरगट्टी, लोकापूर, मुधोळ, रामदुर्ग ,कल्लोळी, कोन्नूर ,कौजलगी व मुनोळी या ठिकाणी नव्याने शाखा सुरू करणार आहोत. तसेच महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर ,जयसिंगपूर ,इचलकरंजी ,सांगली, कुरुंदवाड, वसगडे ,नांद्रे ,समडोळी, दुधगाव ,आष्टा ,,अकीवाट ,दत्तवाड ,अब्दुललाट, हुपरी ,कागल, गांधीनगर ,गडहिंग्लज व इस्लामपूर या ठिकाणी शाखा प्रारंभ करण्यात येणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील ,जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे ,सहाय्यक मॅनेजर शांतिनाथ तेरदाळे, आर.टी.चौगुले,अभिनंदन बेनाडे, प्रकाश जंगटे यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा