बालाजी माध्यमिक विद्यालयाचे बास्केटबॉल स्पर्धेत तिहेरी यश

इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल स्पर्धा दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरच्या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये बालाजी माध्यमिक विद्यालयातील 14,17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या सर्वच संघानी प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचे नांव उज्वल केले सदर सर्व संघाची विभागीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय बागडेसाहेब व हातकणंगले तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेखर शहा सर तसेच महानगरपालिका क्रीडाधिकारी संजय शेटे यांच्या शुभहस्ते होऊन स्पर्धा सुरु झाल्या. सदर प्रसंगी सहा क्रीडा अधिकारी संजय कांबळे व मुख्याध्यापक शंकर पोवार सर, बास्केटबॉल असोशिएशनचे सचिव किरण कोष्टी उपस्थित होते.

या सर्वं यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाविभागप्रमुख राजेश चौगुले सर, उत्तम मेंगणे सर, रवीं चौगुले सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम यांची प्रेरणा मिळाली.

सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडे साहेब सेक्रेटरी मा. महेश कोळीकाल साहेब, मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम व उपमुख्याध्यापक श्री. डी.वाय. नारायणकर सर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष