नांदणीच्या पाटील प्रतिष्ठानचा राजापूरच्या खेळाडूला मदतीचा हात

 नांदणी / शिवार न्यूज नेटवर्क :

राजापूर ता. शिरोळ गावचा उदयोन्मुख युवा क्रिकेट खेळाडू मलिक खुतबुददीन मुजावर यास नांदणी येथील स्व. आपगोंडा कलगोंडा पाटील प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पाटील प्रतिष्ठानने जपला आहे.

राजापूर येथील युवा खेळाडू मलिक मुजावर याची पुणे येथील स्टेडियम क्रिकेट क्लब या ॲकॅडमीमध्ये सराव करण्यासाठी निवड झाली आहे. मलिक हा बॅटिंग व विकेट कीपिंग मध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या खेळाची दखल घेऊन त्याची निवड झाली आहे. पण मलिकच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्याला पुणे येथे जाण्यासाठी क्रिकेट साहित्याची आवश्यकता होती. पण परिस्थितीमुळे त्याला साहित्य खरेदी करणे शक्य नव्हते. मलिकची हि अडचण नांदणी गावचे सुपुत्र आणि मुंबई हायकोर्टातील प्रथितयश वकील मनोज पाटील यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या वडिलांच्या नावाने स्थापित केलेल्या स्वः आपगोंडा कलगोंडा पाटील प्रतिष्ठानतर्फे मलिकला लागणारे क्रिकेट खेळासाठी लागणारे सर्व साहित्य स्वखर्चाने खरेदी करून दिले व एका उदयोन्मुख खेळाडूला पुढे जाण्यासाठी पाठबळ देण्याचे आदर्श कार्य केले. समाजातील सर्व क्षेत्रातील उदयोन्मुख गरीब, होतकरू खेळाडू गरजू प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन अशा विद्यार्थी व खेळाडूंना उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी पाटील प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहिल असे प्रतिष्ठान प्रमुख एडव्होकेट मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी चिपरीचे मा. सरपंच बबन यादव, वैभव पाटील.. पोपट बोरगावे, जयसिंगपूरचे नामवंत क्रिकेट खेळाडू व कोच अमोल भोजने, रविकांत कारदगे, अल्ताफ जमादार, गुराप्पा कुंभार, अरुण मगदूम, राजू पुजारी, संजय पाटील, हसन जंगले आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष