आनंदाचा शिधा सामान्यांना दिलासा देणारा उपक्रम : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

गौरी गणपती सणाच्या निमित्ताने गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकाला हा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अल्प दरात आनंदाचा शिधा दिला जात आहे ही बाब अतिशय स्तुत्य असून राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरात देखील सणाचे उत्साही वातावरण निर्माण होईल, त्यामुळे आनंदाचा शिधा ही राज्य शासनाची योजना सर्वसामान्य नागरिकांना मदत करणारी व दिलासा देणारी आहे, असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, शिरोळ तालुका रेशन दुकानदार धारक संघटनेच्या वतीने लाभार्थींना आनंदाचा शिधा या किटचे वाटप आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते,

राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार असून शिरोळ तालुक्यात ५९,८५३ कुटुंबाना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले, रेशन दुकानदार धारकांची समर्थ कृपा फेडरेशन ही राज्यव्यापी शिखर संस्था या गौरी गणपती सणाच्या निमित्ताने १७५ रुपये मूळ किंमत असलेले पूजा साहित्याचे किट १३० रुपयांमध्ये देत आहे ही बाब देखील कौतुकास्पद आहे असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शेवटी म्हणाले, कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे उपाध्यक्ष अबू बारगीर यांनी स्वागत केले तर रेशन संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रस्तावना करताना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तूंविषयी माहिती दिली, अवघ्या १०० रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये साखर १ किलो, रवा १ किलो, गोडेतेल १ किलो व चनाडाळ १ किलो या चार वस्तू दिल्या जात आहेत, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा या किटचे वाटप करण्यात आले, शिरोळ तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष महादेव कदम, सेक्रेटरी जितेंद्र गुप्ता, बाचू बेडगे, सुरगोंडा पाटील, संतोष चुडाप्पा, संतोष मतीके, श्यामराव चुडाप्पा, संजय पेटकर, यड्राव को-ऑपरेटिव बँकेचे संचालक शिवाजी बेडगे, माजी नगरसेवक महेश कलकुटगी यांच्यासह मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष