पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट बेरोजगारांना रोजगार देणारी वसाहत : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सहकाररत्न शामराव पाटील यड्रावकर यांनी अतिशय दूरदृष्टीने पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना केली, ही औद्योगिक वसाहत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी वसाहत म्हणून आज नावारूपाला आली आहे, या वसाहतीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात, यातील निम्म्याहून जास्त कामगार हे यड्राव आणि परिसरातील आहेत, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट ची संपूर्ण जागा मैल खड्ड्यासाठी वापरण्याचा घाट काही मंडळींनी घातला होता,यड्राव आणि परिसरातील लोकांना याचा त्रास होऊ नये याची काळजी घेत स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी या जागेवर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट ची निर्मिती झाली असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, पार्वती को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते, या वसाहती मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होत असून यासाठी दहा कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर स्ट्रीट लाईट साठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील, शासन आणि वसाहती मधील उद्योजक यांच्या समन्वयातून ७५-२५ योजनेमधून ही कामे केली जाणार आहेत असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले, सुरुवातीला सहकाररत्न शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, संस्थेचे संचालक ताजोद्दीन तहसीलदार गुरुजी यांनी स्वागत केले, अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे संचालक बाळासाहेब केटकाळे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवराना सभेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली संस्थेचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे यांनी श्रद्धांजली चे वाचन केले, यानंतर विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत पाटील यांनी केले विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना उपस्थितानी मंजुरी दिली, आयत्या वेळच्या विषयात उद्योजक शिलकुमार पाटील यांनी औद्योगिक वसाहतीला पिण्याचे पाणी देणार नसतील तर पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांसाठी नगरपंचायत मंजूर करून घ्यावी असा ठराव मांडला या ठरावास सचिन मगदूम यांनी अनुमोदन दिले, यावेळी ज्येष्ठ नेते गजानन सुलतानपूरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट उभारणीचा इतिहास विस्तृतपणे सांगितला, आज पार्वती औद्योगिक वसाहतीला पिण्याचे पाणी देण्यासाठी काही मंडळी विरोध करत आहेत ही बाब गंभीर व चुकीची आहे, आम्ही व्यवसायासाठी पाणी मागत नाही असेही सांगितले, पार्वती औद्योगिक वसाहतीला स्वतःसाठी क वर्ग नगरपंचायत स्थापन करता येत होती, परंतु स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यांनी यड्राव या माझ्या गावचे नुकसान होऊ नये म्हणून असा निर्णय घेतला नाही असेही ते म्हणाले, पार्वती औद्योगिक वसाहतीची उभारणी लोक चळवळी मधून झाली आहे त्यामुळे औद्योगिक वसाहत आणि ग्रामस्थांच्या मध्ये कोणी अंतर आणू नये, यड्राव गाव आणि औद्योगिक वसाहतीचे नाते अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचे असून ते कायम राहावे अशा भावना ही गजानन सुलतानपूरे यांनी यावेळी व्यक्त केल्या, सभेस जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगरसेवक महेश कलकुटगी, शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक डी.बी. पिष्टे, आण्णासाहेब सुतार, संजय नांदणे, आप्पासाहेब बडबडे, संस्थेचे संचालक किरण बरगाले, महावीर पाटील, चंद्रकांत कांबळे, जैनुल बागवान, श्रीमती रत्नमाला गांधी, सौ सुवर्णा पाटील, संजय बिडला यांच्यासह सभासद व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा