महालक्ष्मी तरूण मंडळाची आरती सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते संपन्न
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड येथील महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळाची आरतीचा मान कुरूंदवाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी नवे दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, पोलिस पाटील डॉ. स्वाती कुन्नुरे, दिनेश कांबळे, अनिल कुन्नुरे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा