आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अवघ्या पाच वर्षात उल्लेखनीय कार्य करून समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचा व सामान्य जनतेचा विकास करणारी संस्था म्हणून नावलौकिकाला आलेली आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची वार्षिक सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे यांनी आपल्या प्रास्ताविक व मनोगतात संस्थेच्या विकास व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेताना, संस्थेने आतापर्यंत प्रगती कशी केली? याचा आलेख संस्थेच्या सदस्या समोर मांडला आणि यावर्षी संस्थेला 15 लाख 50 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, संस्थेकडे अकरा कोटीपेक्षा अधिक ठेवी असून, सभासद संख्या 740 असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ऑडिट रिपोर्ट 'ए' क्लास मध्ये असून संस्था संपूर्ण शहरांमध्ये 18% लाभांश देणारी एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभी दीप प्रज्वलन माननीय अध्यक्ष श्री अमोल पाटील श्री बाहुबली कलाजे व उपस्थित मान्यवर श्री रामु कलाजे, बाळगोडा पाटील, नितीन सपकाळे, श्रीकांत कलाजे, रावसाहेब पाटील, भरतेश उदगावे, संभाजी डांगे, दस्तगीर अपराज, अनुराग दिक्षित, संजय पाटील, सौ पूजा गिडगल्ले, सौ. मंगल करगावे, मोहन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेने सामाजिक बांधिलकी ओळखून समाजातील निवृत्त शिक्षक श्री अनिल कुमार डेक्कनवर, व महावीर हुद्दार व निवृत्त भारतीय सेनादलातील आशिष छपरे, संजीव निंबाळकर,राजेंद्र कुलकर्णी, सूर्यकांत धनवडे, या सैनिकांचा व सुमेरू पाटील यांचा सत्कार शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री संतोष मडिवाळ व अभिषेक करगावे यांनी केले. या सभेसाठी संस्थेचे सल्लागार श्री प्रवीण संभोजे, मंजुनाथ जंगळी, भरत तिप्पांनावर, पुनीत सूनगार व कायदेशीर सल्लागार सरफराज झाडवाले यांच्यासह बहुसंख्य महिला सदस्य, शेकडो सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्व उपस्थितांना स्नेह भोजनाचा आस्वाद देण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा