हेरवाड उपसरपंचपदी हयातचॉंद जमादार यांची निवड

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हयातचॉंद जमादार यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या.

हेरवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील यांचा आघाडीने नेमून दिलेला कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी सरपंच रेखा जाधव यांनी ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी विशेष सभा बोलवली होती. हयातचॉंद जमादार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच जाधव यांनी केली.

यावेळी दिलीप पाटील, दामोदर सुतार, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, प्रथमेश पाटील, माजी सभापती मिनाज जमादार, सुवर्णा अपराज, पायगोंडा आलासे, सुनिल माळी, बाबासाहेब नदाफ, अब्दुल जमादार, शंकर माने, रघुनाथ पुजारी, एम.आर.आलासे, माजी सरपंच चंद्रकला पाटील, शोभा पाटील, सुभाष देबाजे, बंडू बरगाले, सदानंद आलासे, राजेंद्र परूळेकर, प्यारेलाल मकानदार, अर्जुन जाधव, सरदार जमादार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नागरिक उपस्थित होते. उपसरपंचपदी जमादार यंाची निवड होताच समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष