सहकारी सेवा संस्थांना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे : विराजसिंह यादव
दिनबंधू कै दिनकररावजी यादव विकास संस्था व दूध संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
अपात्र कर्जमाफी प्रकरणामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या सहकारी विकास सेवा संस्था आर्थिक संकटात सापडल्या याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे या अपात्र कर्जमाफीतील सोसायटीकडून बँकांनी कर्ज वसूल करून पण शेतकऱ्यांकडून सोसायटीकडे कर्जाची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल झाली नाही व शासनाने ती करून दिली नाही याचा आर्थिक फटका सहकारी संस्थांना बसला या अडचणीत असलेल्या सहकारी विकास सोसायटींना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन अनुदान द्यावे अशी मागणी दिनबंधू दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन व दूध संस्थेचे चेअरमन विराजसिंह यादव यांनी केली.
येथील दिनबंधू कै दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था व दिनबंधू कै दिनकररावजी यादव दूध व्यवसायिक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते सभासदांनी दोन्ही संस्थेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि दोन्ही संस्थेचे संस्थापक अनिलराव यादव यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.
दिनबंधू के दिनकररावजी यादव सेवा संस्थेचे चेअरमन दगडू चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व्हाईस चेअरमन विराजसिंह यादव यांनी दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतामध्ये घेतला सचिव राजेंद्र यादव यांनी अहवाल व ताळेबंद पत्रक आणि विषय पत्रिकेचे वाचन केले.
संस्थेचे संस्थापक व संचालक अनिलराव यादव यांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली या सभेस सेवा संस्थेचे संचालक शिवाजीराव चव्हाण दत्तात्रय काळे रामचंद्र गंगधर मोहन पाटील दत्तात्रय पुजारी मन्सुर शेख आयजाक भोरे प्रविणसिंह माने श्रीमती लक्ष्माबाई पाटील सौ संगिता संकपाळ दिनबंधु दिनकरराव यादव सहकारी दुध व्यावसायिक संस्थचे व्हाईस . चेअरमन पांडुरंग पोवार , बाळासो चव्हाण, दत्तात्रय काळे , श्रीमती सुशीला मुळीक श्रीमती लक्ष्मीबाई पाटील सुनील कोळी आयजाक भोरे,सौ साऊबाई पुजारी . यांच्यासह दोन्ही संस्थेचे सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा