जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी या संस्थेची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी नारायणी हॅाल,इचलकरंजी येथे उत्साहात संपन्न झाली.
संस्थापक अशोक कोळी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.चेअरमन जया कोळी यांनी सर्वांचे स्वागत करुन संस्थेचा ताळेबंद सादर केला. अवघ्या ६ वर्षात संस्थेने नेत्रदिपक प्रगती केलेली आहे. सभासद संख्या -१६०० इतकी असून भागभांडवल १,२८,४९,१०० इतके आहे. ठेवी१६,६०,६९,७०९ असून १७,४०,३३,०४३ इतकी कर्जे वाटप केलेली आहेत. संस्थेला३०,२०,९७९ रुपये नफा झालेला आहे.ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे.१० % लाभांश वाटप करण्यात आलेला आहे.व्ही.एच. पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.सर्व विषयांनी सभासदांनी एकमतांनी मंजुरी दिली. सभासदांनी संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा करणेस मंजूरी दिली त्यामुळे यापुढील काळात जिजाऊ पतसंस्था जिल्ह्याच्या नकाशावर येणार.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त शाळा, शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक,विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यांचा सत्कार करणेत आला. सभेस दि प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन सुनिल एडके,सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे,शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार,अॅाडीटर नागनाथ बसुदे,पत्रकार विजय चव्हाण,इराण्णा सिंहासने, दिलीप शिरढोणे यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. आभार व्हाईस चेअरमन शैलजा पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन संचालिका रेखा पाटील व आनंदा कोदले यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा