घोडावत विद्यापीठात 'फार्मसी डे', 'कोविजलन्स सप्ताह' साजरा

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संजय घोडावत विद्यापीठात फार्मसी डे व फार्मा कोविजिलन्स सप्ताह साजरा करण्यात आला.

      यामध्ये आंतरराष्ट्रीय सैंडोज फार्मसी कंपनी हैदराबादचे शास्त्रज्ञ समीर जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मसी विषयाचे महत्त्व,औषधांचे परीक्षण, वर्गीकरण, शरीरावर होणारे औषधांचे वाईट परिणाम, त्याचे मोजमाप संगणकाद्वारे कसे केले जाते याबाबत सविस्तर माहिती दिली.

      अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलचे एमडी डॉ.सुहास दामले यांनी 'अवयव दान महादान' या विषयावर विस्तृत असे भाषण केले.यामध्ये समाजातील एक मृत व्यक्ती किती लोकांचे जीव वाचू शकते, आपण कोण कोणते अवयव दान करू शकतो,कोणत्या वेळेमध्ये अवयव दान करता येतात यासंबंधात विद्यार्थ्यांचे समज गैरसमज दूर केले.

     या सप्ताहात आयोजित केलेल्या स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. सुभाष कुंभार,विभाग प्रमुख विद्याराणी खोत उपस्थित होत्या. या कार्यक्रमास अकॅडमिक डीन डॉ. व्ही. व्ही.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.अश्विनी चकोते यांनी केले.आभार प्रा.शिवानी समर्थ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.अवधूत अथणीकर, टी एस जंगम, प्रा.स्नेहा केटकाळे, प्रा. सुजाता खराडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मंडळाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष