शिरोली ते जयसिंगपूर मार्गावरील ग्रामीण एस.टी. थांबे पूर्ववत करावेत : युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची मागणी

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील शिरोली ते जयसिंगपूर मार्गावरील ग्रामीण एस.टी. थांबे पूर्ववत करावेत अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विभागीय नियंत्रक अलका बारटक्के यांना देण्यात आले आहे. हे थांबे पूर्ववत न केल्यास येत्या पंधरा दिवसात महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राकेश खोंद्रे यांनी दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे, या महामार्गावर शहर व ग्रामिण भागतील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच कॉलेजचे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक, महिला, नोकरदार यांची रोजची ये-जा होत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. कडून ग्रामीण भागाच्या ठिकाणी एस. टी. थांबा आहे, त्या ठिकाणी एस.टी. थांबा घेत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रुकडी अतिग्रे फाटा, घोडावत विद्यापीठ, तमदलगे, निमशिरगाव आधी ठिकाणचे थांबे पूर्ववत करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राकेश खोंद्रे यांनी दिला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष