शिरोळ तालुका अंक विक्रेता संघ यांच्या वतीने जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
पंधरा ऑक्टोबर म्हणजे जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन. ऊन्ह, वारा, पाऊस, थंडीचा सामना करत विक्रेता रोज सकाळी प्रत्येक घरी वृत्तपत्र पोहोचवण्याचं काम इमाने-इतबारे करतो.जगभरातील घटना-घडामोडींबरोबर सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती व ज्ञानाचा खजिना त्यांच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचतो. साहजिकच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस आहे असे प्रतिपादन सचिन कोरोचीकर सहाय्यक शिक्षक भगवानराव घाटगे हायस्कूल चिंचवड यांनी अध्यक्षस्थानी बोलताना मत व्यक्त केले
यावेळी तालुक्यातील शिरोळ तालुका अंक विक्रेते अध्यक्ष रायाप्पा बाळीगिरी, उपाध्यक्ष नागेश गायकवाड, सचिव धंनजय सावंत, खजिनदार चिदानंद कांबळे व संघटनेचे ज्येष्ठ सुकुमार पाटील, अनील माने, शिवराज कांबळे, दिलीप कुदे, प्रकाश पाटील, संजय शिंदे, महेश कोरे, राकेश बलवान, सचिन राजमाने, सुरेश गुरव, आधी विक्रेते उपस्थित होते, आभार नागेश गायकवाड यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा