बोरगांव ची श्री अरिहंत मल्टीस्टेट संस्था सहकार क्षेत्रात भूषण ठरेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

 बोरगाव श्री अरिहंत संस्थेची जयसिंगपूर येथे 57 व्या शाखेचा थाटात उद्घाटन समारंभ 



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

33 वर्षांपूर्वी सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या बोरगाव श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था सहकार क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख कामांना प्राधान्य दिले. विश्वास,पारदर्शकता , प्रामाणिकतेला विशेष महत्त्व देऊन कर्नाटक राज्यात नावलौकिक मिळवलेल्या या संस्थेने आता महाराष्ट्र राज्यातही शाखा विस्तारित करून महाराष्ट्र राज्यात जयसिंगपूर येथे पहिली शाखा उद्घाटनाच्या माध्यमातुन सहकार क्षेत्र बळकट केले आहेत. त्यामुळे ही संस्था नक्कीच सहकार क्षेत्रात भूषण ठरेल असा ठाम विश्वास माजी मंत्री,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.

आज जयसिंगपूर येथे श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी लि, बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेचा 57 वी शाखेचा उद्घाटन प.पू. स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ,दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, व संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते फोटो पूजन, उधानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व उद्योगपती रनजीत कुलकर्णी यांच्या हस्ते लॉकर चे उद्घाटन करण्यात आले.

युवा नेते उत्तम पाटील यांनी स्वागत करून, विश्वासामुळेच सहकार क्षेत्राची प्रगती होत असते. आणि हाच विश्वास अरिहंत संस्थेने गेल्या 33 वर्षात जपला आहे. जयसिंगपूर व परिसरातील उद्योग व्यवसायांना चालना देत जयसिंगपूर नगरीच्या अर्थव्यवस्थेत आणखीन भर पडावी याच उद्देशाने या ठिकाणी शाखेचा प्रारंभ केला असून शाखा प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले.

उद्घाटनाचे औचित्य साधून अनेकांनी संस्थेस भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी विविध ठेवी योजनांचा लाभ घेऊन ठेवी ठेवले.

या कार्यक्रमास जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, पृथ्वीराज पाटील, विनोद घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, दादा पाटील चिंचवडकर , राजू झेले,घोडावत कॉलेजचे विश्वस्त विनायक भोसले , डॉ.जे.जे .मगदूम कॉलेज चेअरमन विजयराज मगदुम,सी. बी. पाटील, प्रकाश झेले ,अनिल बागणे, ,कोथळी चे धनगोंडा पाटील ,संजय नांदने, ,दिलीप पाटील, विनोद चोरडिया, राकेश घोडावत, सुनील पाटील, मजलेकर ,अण्णासाहेब क्वाणे,राजू चौधरी , भोला कागले, दीपक बियाणी ,श्रेणिक कुडचे , जूगलशेठ सारस्वत , संजय बरगाले , दैनिक नवा महाराष्ट्र चे संपादक अशोक कोळेकर ,मिलिंद भिडे, द.भा.जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील ,निकेश गिडवाणी, अरविंद मजलेकर , वर्धमान पाटील, राजकुमार खवाटे, अरिहंत शुगर चे एम डी शेट्टी, संस्थेची सीईओ अशोक बंकापुरे,सह जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक व शिरोळ नगरपालिकेचे नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर ,विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी शाखाधिकारी शांतिनाथ तेरदाळे यांनी सर्वांचे आभार मानले.                                        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष