शिरोळच्या स्वीकृत नगरसेवक पदी दयानंद जाधव यांची निवड
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राजश्री शाहू विकास आघाडीचे दयानंद जाधव यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील- मलिकवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी पालिकेच्या दिनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते दयानंद जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने दयानंद जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी घोषित केले या निवडीनंतर राजश्री शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवक दयानंद जाधव समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की राजश्री शाहू विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना शहरातील मातब्बर व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली शहराच्या प्रगतीसाठी या सर्व स्वीकृत नगरसेवकांचेही सहकार्य लाभले
नगरसेवक पै प्रकाश गावडे म्हणाले की नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राजश्री शाहू आघाडीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी व श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकासाची घोडदौड सुरू आहे जनतेने दिलेल्या विश्वासास पात्र राहुन लोकाभिमुख कारभार केला आहे.
नूतन स्वीकृत नगरसेवक दयानंद जाधव म्हणाले की राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी आणि नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व सर्व नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी असून शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे , नगरसेवक प्रकाश गावडे, राजेंद्र माने, डॉ अरविंद माने, तातोबा पाटील , श्रीवर्धन माने देशमुख, राजाराम कोळी , कमलाबाई शिंदे, जयश्री धर्माधिकारी, सुनिता आरगे , अनिता संकपाळ, सुरेखा पुजारी , माजी सरपंच अर्जुन काळे बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख , माजी नगरसेवक आण्णासो गावडे, एन वाय .जाधव, रावसाहेब पाटील मलिकवाडे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे , अमरसिंह शिंदे सुरज कांबळे, अण्णासो पुजारी रामचंद्र पाटील , अर्जुन काळे, सुभाष माळी, विवेक फल्ले, सर्जेराव कांबळे सुजाता पाटील विरसिंह पाटील एकनाथ पाटील उल्हास उत्तमराव पाटील स्वप्निल पाटील राहुल जाधव अमर माळी सूर्यकांत संकपाळ यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवक दयानंद जाधव यांच्या समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा