बालाजीचा शालेय विभागिय वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड हार्क्युलस जिम व जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा दिनांक 19 व 20 आक्टोबर 2023 रोजी हार्क्युलस जिम कुरुंदवाड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदरच्या स्पर्धा 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रशालेच्या 17 व 19 वर्षाखालील ।। मुलानी तर 3 मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये श्रेयस हेदुरे एजाम मोमीन यांनी गोल्ड मेडल पटकावले तर प्रथमेश चव्हाण, तुळशीदास मेंगणे, पृथ्वीराज घायदार ही मुले रौप्य पदकाचे मानकरी ठरले तर मुलींमध्ये श्रेया पाटील हीने गोल्ड मेडल तर, प्रिती दुरुगडे, व पायल उपलाने या मुली कास्य पदकाच्या मानकरी ठरल्या तसेच अकबर मसुते, तुषार भागवत, आयुष पांडव समर्थ गौंड व श्रवण तुरुंबेकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सर्वांनी आपल्या दैदिप्यमान यशाने प्रशालेचे नाव उज्वल केले. तर श्रेयस हेदुरे, एजाज मोमीन व श्रेया पाटील यांची ठाणे येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाविभागप्रमुख राजेश चौगुले सर, उत्तम में गणे सर, रवी चौगुले सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ मॅडम यांची प्रेरणा मिळाली.
सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडे साहेब सेक्रेटरी मा. महेश कोळीकाल साहेब, मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम व उपमुख्याध्यापक श्री. डी. वाय. नारायणकर सर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा