के.व्ही.पाटील यांचा विविध मान्यवरांकडून सन्मान



कागल / शिवार न्यूज नेटवर्क :

मा.हसनसो मुश्रीफ फौंडेशन, कागल यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त के.व्ही.पाटील यांचा विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

        पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे, निमंत्रित सदस्य शिक्षण समिती जिल्हा परिषद कोल्हापूरचे सुकुमार पाटील,अल्लाबक्ष नदाफ,साने गुरुजी शिक्षक पतसंस्था जयसिंगपूरचे व्हा. चेअरमन -मेहबूब मुजावर,दिलीप शिरढोणे, प्रकाश पाटील, मंगल,हेमलता देसाई, संदिप देसाई, शुभम, अंकुश देवडकर, राजनंदिनी पाटील आणि विराज देसाई यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

        तर सोनगे येथील ग्रामस्थांच्याकडून माजी सरपंच सुनिल घोरपडे,उपसरपंच पांडुरंग कुंभार,विलास कळंत्रे, ईश्वरा देवडकर,अरूण शिंत्रे, दिनकर ढोले आणि बाळासाहेब घोरपडे यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला.

        कृष्णात विष्णू पाटील  (के.व्ही.) यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय तसेच पदवीधर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिले आहेत.

        कागल तालुका पदवीधर संघटनेचे अध्यक्ष असून स्वतः जबाबदारी घेवून संघटनेचे कार्य करतात.सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.अशा कर्तृत्ववान व्यक्तींला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष