दीपावलीनिमित्त शिरोळ पालिका कर्मचाऱ्यांना १५००० रुपये सानुग्रह अनुदान : सभेत निर्णय



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून नागराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा घेण्याबरोबरच दीपावली सणानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना १५००० रुपये सानुग्रह अनुदान देणे यासह अन्य विषयांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

    नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नगरपरिषदेच्या दीनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले या सभेत मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आला शिरोळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत चर्चा करून पर्यायी जागा सुचवून आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून सुधारित आराखडा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला . शिरोळ नगरपालिकेच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला कलेश्वर तलाव गट नंबर १ मध्ये पाथ वे वर आणि परिसरामध्ये अडथळा करणारी उच्च दाब वाहिनी अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला दीपावली सणानिमित्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांना १५००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या सभेत झाला तसेच शहरात विविध ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामांची निश्चिती करण्यात आली शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याविषयी चर्चा झाली . शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियम उभारण्यासाठी कलेश्वर तलाव परिसरात जागा आरक्षित करण्याची मागणी केली या अर्जाचे वाचन करून कल्लेश्वर तलाव परिसरात गायरान जमिनीतील १ एकर जागा अरीक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला नगरपालिका दप्तरी शहरातील पत्रकार आणि कलाकारांची नोंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच आयत्यावेळी आलेल्या विषयांवर चर्चा करून व आलेल्या अर्जांचे वाचन करून सर्वानुमते योग्य ते निर्णय घेण्यात आले .

        या सभेत नगरसेवक प्रकाश गावडे पंडित काळे इम्रान आत्तार राजेंद्र माने सौ कमलाबाई शिंदे यांनी चर्चेत भाग घेतलाया.वेळी उपनगराध्यक्षा सौ. करुणा कांबळे, नगरसेवक योगेश पुजारी, डॉ अरवींद माने, तातोबा पाटील , दयानंद जाधव , नगरसेविका जयश्री धर्माधिकारी , सुनिता आरगे , अनिता संकपाळ , सुरेखा पुजारी प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांच्यासह पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष