शिरोळमध्ये उद्यापासून चक्री उपोषण ; लोकप्रतिनिधींना गाव बंदीचा निर्णय

 योद्धा मनोज जरांगे - पाटील यांच्या मराठा समाज आरक्षण लढ्यास जाहिर पाठिंबा ; टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आरक्षण लढ्याचे योद्धे मनोज जरांगे - पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यास जाहिर पाठिंबा देण्यात आला . मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी बरोबरच आरक्षण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात रविवार पासून चक्रीय उपोषण तसेच आमदार , खासदार यांच्यासह मंत्री महोदयांना गाव बंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला .

             येथील छत्रपती तख्त येथे झालेल्या सकल मराठा समाज संघटनेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बैठक निमंत्रक धनाजी पाटील - नरदेकर होते . मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शहरातील तरुण मंडळे, नागरिकांचा सहभाग घेवून चक्रीय उपोषण सुरूच ठेवण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अंदोलनाची तीव्रता वाढविण्या करिता कॅन्डल मार्च, निषेध फेरी यासह आक्रमक अंदोलन करण्याबाबत पुन्हा बैठक बोलावावी असे सर्वानुमते ठरले.

            या बैठकीत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रावसाहेब देसाई , पृथ्वीराज यादव , बंटी देसाई , धनाजी चुडमुंगे , पंडित काळे , धनाजी पाटील - नरदेकर , दरगू गावडे , किशोर पाटील , विराज यादव , बजरंग काळे , शिवाजीराव माने - देशमुख , गजानन संकपाळ , संजय चव्हाण , बाळासो कोळी , पांडुरंग माने , शिवाजी जाधव - सांगले , किरण गावडे , विनोद मुळीक , विजय आरगे , शक्तिजीत गुरव यांच्यासह सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पृथ्वीराजसिंह यादव यांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष