भाजपाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक : राहुल आवाडे

 

शिरोळात भाजपा नेते अनिलराव यादव यांची घेतली सदिच्छा भेट


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

भारतीय जनता पार्टी या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास आपणही निवडणूक निश्चितपणे लढवणार आहोत यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते राहुल आवाडे यांनी केले.

युवा नेते राहुल आवाडे यांनी शिरोळ येथील भाजपा नेते अनिलराव यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी अनिलराव यादव व पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत ही निवडणूक लढवणार असून सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी अनिलराव यादव यांनी यादव व आवाडे घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांबरोबर ऋणानुबंध आहेत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आमदार सा रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलो आहे त्यामुळे निश्चितपणे निवडणुकीत योग्य ते विचार केला जाईल असे आश्वासन यादव यांनी दिले.

यावेळी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव विराज यादव संजयसिंह यादव नगरसेवक पंडित काळे राजाराम कोळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण माजी सरपंच गजानन संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ उर्फ पिंटू फल्ले विजय आरगे रुपेश मोरे उदय संकपाळ यांच्यासह यादव गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष