किरण पाटील यांना योग्य वेळी योग्य संधी देणार : आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 किरण पाटील यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे त्यांनी जनतेचे कामे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन निश्चितपणे योग्य वेळी योग्य संधी देणार असल्याचे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले.

बुधवारी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते यादरम्यान त्यांनी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील कणगलेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील हे उपस्थित होते.

किरण पाटील व परिवाराच्या वतीने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि गणपतराव पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आमदार पाटील यांनी किरण पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

श्रीमती प्रमिला रावसाहेब पाटील, सचिन पाटील, गीतंन यादव, रुपेश मोरे, नितीन बागे, उल्हास पाटील, प्रल्हाद भोसले, अनिकेत गायकवाड, संजय जाधव, ऋतुराज जाधव, कैलास रजपूत, विश्व मांजरेकर, उदय भोसले, प्रकाश खांडेकर, अक्षय शेंडगे, श्रेणिक शेट्टी, लखन कोळी, सद्दाम सुतार, फिरोज शेख, समीर अत्तार, सागर जाधव, प्रमोद कारदगे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष