मराठा आरक्षण : आमदार यड्रावकर मराठा समाजासोबत
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मागील अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या या न्याय मागणी सोबत होते,या पुढच्या काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ते नेहमीच मराठा समाजासोबत कायम राहतील अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र आदित्य राजेंद्र यड्रावकर यांनी दिली, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले श्री. मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरोळ येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या साखळी उपोषणास आदित्य यड्रावकर यांनी मंगळवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी ते बोलत होते, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या खासदार व आमदारांच्या बैठकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला गेले आहेत असे सांगताना सोमवारी त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून मराठा समाजाच्या मागणीबाबत आपण मराठा समाजा सोबत निर्धाराने उभे राहणार असल्याचे सांगितले होते,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या भेटीत राज्यातील सद्यपरिस्थिती व मराठा समाजाच्या न्याय मागणीबाबत आपण आग्रही राहणार असल्याचेही आमदार यड्रावकर यांनी म्हटले आहे, आमदार यड्रावकर यांच्या वतीने मी आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या पाठीशी यड्रावकर परिवार आहे हे सांगण्यासाठी आलो आहे असेही आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, यावेळी प्रताप उर्फ बाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख, धनाजी पाटील नरदेकर, बजरंग काळे (गुरुजी), उल्हास पाटील, धीरज शिंदे, विनोद मुळीक, रामदास गावडे, गुरुदत्त देसाई, भगवान गावडे, प्रकाश गावडे, बाबुराव गावडे, नितीन कोळी यांच्यासह शिरोळ गावातील मराठा समाज बांधवांचे प्रतिनिधी व युवक उपोषणस्थळी उपस्थित होते, आदित्य यड्रावकर यांच्या उपस्थितीत मंगळवारच्या या साखळी उपोषणाची सांगता झाली, त्यांच्यासोबत जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे उपस्थित होते.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा