कुरुंदवाड आगारासाठी लवकरच दहा नवीन गाड्या मिळणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड आगार आहे. या आगारासाठी सध्या असलेल्या एसटी बसेस अपुऱ्या पडत होत्या, जादा नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी आगार व्यवस्थापन नेहमी मागणी करत होते, मी स्वतः याबाबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पत्र लिहून व प्रत्यक्ष भेट घेऊन कुरुंदवाड आगारासाठी नवीन बसेस मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये कुरुंदवाड आगारासाठी नवीन १० एसटी बसेस देण्याची व्यवस्था परिवहन तथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आणि तातडीने गाड्या उपलब्ध करून देण्याबाबत आदेश त्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले,
सध्या कुरुंदवाड आगरा कडे ३६ एसटी बसेस कार्यरत आहेत, कुरुंदवाड आगारातून मुंबई, पुणे, नाशिक आणि गोवा या लांब पल्याच्या गाड्या देखील सोडण्यात येतात, पण गाड्यांची संख्या अपूरी असल्यामुळे सध्या मुंबई व गोवा या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, आगारात नवीन एसटी बसेस दाखल होताच लांब पल्याच्या सेवा देणे आता शक्य होणार आहे, कुरुंदवाड आगाराकडील अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, विशेषता शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एसटी गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे मोठी गैरसोय होत होती, या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे कुरुंदवाड आगारासाठी नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी सातत्याने आग्रही होतो, या आपल्या मागणीला यश आले असून लवकरच या दहा नवीन बसेस कुरुंदवाड आगाराच्या सेवेत दाखल होतील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा