महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे पन्हाळा येथे शनिवारी पासून कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर
दि. ७ ते ९ ऑक्टोबर अखेर शिबिराचे आयोजन ; राज्यातून सुमारे ४०० कामगार सहभागी होणार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने पन्हाळा (जि कोल्हापूर ) येथील गिरिस्थान नगरपरिषद सभागृह पन्हाळा येथे शनिवारी ७ ऑक्टोबर ते सोमवारी ९ ऑक्टोबर दरम्यान कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार आहे.
पन्हाळा येथे होणाऱ्या प्रतिनिधी मंडळाच्या कार्यकर्ता शिबिरास राज्यातून कामगार संघटनेचे निवडक चारशे लोक यामध्ये सहभागी होतील अशी माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.
ते म्हणाले , राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ ही संघटना महाराष्ट्रातील साखर कामगारांची शिखर संस्था असून वेतन वाढीबरोबरच कामगार संघटन याबाबत संस्था काम करते
शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचे हस्ते होणार आहे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत समारंभास राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी आर पाटील माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड केशवराव जगताप देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील हे उपस्थित राहणार आहेत . दुपारी २ वाजता दुसऱ्या सत्रात अँड ए पी चौगुले यांचे कामगार हक्क व कर्तव्य याविषयी व्याख्यान होणार असून दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील यांचे कामगार चळवळ व नवीन कामगार कायदे याविषयी प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे
रविवारी ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे तणावमुक्त जीवन आनंदाने जगूया याविषयी व्याख्यान होणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता अजित अभ्यंकर यांचे कामगार संघटना आणि चळवळ या विषयावर तर दुपारी चार वाजता अँड संतोष मस्के यांचे कामगार कायदे आणि दक्षता या विषयावर व्याख्यान आहे
सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी आमदार विनयराव कोरे दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील भोगावती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उदयसिंह पाटील - कौलवकर पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न होणार आहे
दरम्यान , शिबीर यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस शंकरराव भोसले,कार्याध्यक्ष अविनाश आपटे , राऊसाहेब पाटील कोषाध्यक्ष प्रदीप बनगे उपाध्यक्ष युवराज रणवरे अशोक बिराजदार नितीन बेनकर प्रदीप शिंदे सचिव सयाजी कदम संजय पाटील राजेंद्र तावरे संजय मोरबाळे योगेश हंबीर ,यांचे मोलाचे योगदान लाभत आहे असेही अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा